मॉरिशसच्या किनाऱ्यावर १८ देवमासे मृतावस्थेत

वृत्तसंस्था
Friday, 28 August 2020

देवमाशांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.पोट व फुप्फुसांच्या भागाचे विच्छेदन झाल्यानंतरच नेमके कारण समजेल असे मॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी सांगितले

पोर्ट लुईस (मॉरिशस) - मॉरिशसच्या समुद्रकिनाऱ्यावर किमान १८ देवमासे वाहून आले. यातील काही मृतावस्थेत होते, तर इतरांनी थोड्याच वेळात प्राण सोडला.

आग्नेयेकडील ग्रँड सेबल किनाऱ्यावर हे देवमासे भरकटले. काही देवमाशांना जखमा झाल्या होत्या. मॉरिशसचे मत्सोद्योग मंत्री सुधीर मौधू यांनी या महिन्याच्या प्रारंभी जपानी जहाजातून झालेल्या इंधनगळतीशी याचा संबंध असल्याची शक्यता फेटाळली. देवमाशांच्या शरीरावर किंवा त्यांच्या श्वसनसंस्थेत हायड्रोकार्बनचे अंश आढळले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देवमाशांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. पोट आणि फुप्फुसांच्या भागाचे विच्छेदन झाल्यानंतरच नेमके कारण समजेल असे मॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी सांगितले.

स्थानिक सरकारी अधिकारी प्रीतम दौमू यांनी सांगितले की, मृत देवमासे पाहून अनेक रहिवाशांना इंधनगळतीमुळे हे घडल्याची भिती वाटली होती. या किनाऱ्यापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर एक जहाज भरकटून एक हजार टनापेक्षा जास्त इंधनाची गळती झाली होती. त्यामुळे मॉरिशसच्या जैवसंपदेचे दिर्घकालीन नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. जहाजाचा तुटलेला पुढील भाग सोमवारी समुद्रात बुडाला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भरकटल्याची शक्यता
मॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी २००५ मध्ये याच प्रकारचे ७० देवमासे भरकटल्याचा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की, हे देवमासे छोट्या माशांच्या मागोमाग खाऱ्या पाण्याच्या सरोवरात शिरले असावेत. त्यानंतर समुद्रात परतण्याचा मार्ग न मिळाल्याने ते गोंधळून गेले असावेत. त्यातून ते थेट प्रवाळ खडकांच्या दिशेने गेले असावेत. परिणामी ते प्रवाळ खडकांवर धडकले असावेत. अखेरीस दमछाक होऊन त्यांचा प्राण गेला असावा.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eighteen Whales Die In Mauritius Stranding

Tags
टॉपिकस