बायको पुढे वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी २०० च्या स्पीडने चालवली पोर्शे, गमावला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बायको पुढे वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी २०० च्या स्पीडने चालवली पोर्शे, गमावला जीव
बायको पुढे वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी २०० च्या स्पीडने चालवली पोर्शे, गमावला जीव

बायको पुढे वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी २०० च्या स्पीडने चालवली पोर्शे, गमावला जीव

सर्वात वेगात गाडी चालवण्याचा विक्रम प्रस्थापित करण्याच्या नादात एका प्रसिद्ध ड्रायव्हरचा मृत्यू झाला. यॉर्क जवळील एल्विंग्टन येथे झालेल्या अपघातात 47 वर्षीय ड्रायव्हर आयझेनबर्ग जागीच ठार झाला. आयझेनबर्ग हा ब्रिटिश मोटरस्पोर्ट्समधील सुप्रसिद्ध ड्रायव्हर होता. एका पोर्शे कारच्या माध्यमातून वेगाचे रेकॉर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न करत तो करत होता. शेवटचा प्रयत्न पूर्ण करत असताना भरधाव वेगात असलेली त्याची कार पलटी झाली आणि त्यातच तो गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे हा अपघात झाला त्यावेळी त्याची बायकोही त्याठिकाणी उपस्थित होती. (Eisenberg, a British driver, died in accident while trying set a speeding record)

रेस मार्शल ग्रॅहम सायक्स यांनी म्हटलं की, ''आयझेनबर्ग यांनी गाडीचा वेग कमी करण्यासाठी डिझाइन केलेले ब्रेकिंग पॅराशूट मागवले होते, कारण त्यांनी स्वतःचे बेस्पोक डिझाइन तयार केले होते. दिवसभर सर्व काही व्यवस्थित चालू होतं. पण दुपारी शेवटच्या रनदरम्यान पॅराशूट सुरु होताच गाडी वर उचलली जाऊ लागली या कारणामुळे कार अस्थिर आणि अनियंत्रित झाली आणि हा दु:खद अपघात झाला.''

मोटरस्पोर्ट यूकेने प्रयत्न समन्वयक म्हणून नियुक्त केलेले माल्कम पिटवुड म्हणाले की, मिस्टर आयझेनबर्ग फ्लाइंग स्टार्ट आणि स्टँडिंग स्टार्टसाठी राष्ट्रीय वेगाचे रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु तो अपयशी ठरला. तो जगातील सर्वात वेगवान पोर्श मोटर कार चालवू शकतो, असं आयझेनबर्ग यांना वाटत होतं, या विक्रमाची नोंद केली जावी अशी त्याची इच्छा होती."

2016 साली सुद्धा झाला होता अपघात-

2016 मध्ये याच एअरफील्डवर ब्रिटनच्या सर्वात वेगवान मोटरसायकल अपघातात आयझेनबर्ग आधीच वाचला होता. त्याची मोटारसायकल त्याला धावपट्टीच्या शेवटी थांबवता आली नाही आणि त्याचा पायाची हाडे तुटली. त्यांनंतर तो पुन्हा चालायला शिकला.

टॅग्स :accidentdeathcardriver