अमेरिकन अध्यक्षांबाबत 48 वर्षात प्रथमच चुकला शाळेचा अंदाज

Benjamin Franklin Elementary School
Benjamin Franklin Elementary School

न्युयॉर्क - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असते. निवडणूक निकालांच्या आधी एक्झिट पोलची देखील जोरदार चर्चा असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार? निवडणूकीचा निकाल काय लागणार? याबाबत यॉर्कटाउन येथील बेंजामिन फ्रँकलिन प्राथमिक शाळा गेले 48 वर्षे आपला अंदाज नोंदवत आहे. विशेष म्हणजे 1968 पासून हा अंदाज नेहमी खरा ठरत आला होता. पंरतु, या वर्षी पहिल्यांदाच शाळेचा अंदाज चूकला. तरी मुलांच्या सामाजिक विषयाच्या विकासात 'मॉक' (mock) निवडणूकीची ही प्रक्रीया फारच उपयोगी असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका पॅट्रिशिया मूर यांनी व्यक्त केले आहे.

निकाल नोंदविण्यासाठी दर वेळी मुख्य निवडणूकीच्या काही दिवसआधी शाळेतर्फे मॉक निवडणूकीचे आयोजन करण्यात येते. या मॉक निवडणूकीच्या काही महिने आधी बालवाडी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना या विषयात खरंच रुची आहे असे विद्यार्थी काही महिने दोन्ही उमेदवारांचा अभ्यास करतात. उमेदवारांना A आणि B असे नाव देण्यात येते. व त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानंतर वर्गात याबाबत चर्चा करण्यात येते आणि मॉक निवडणूकीत हे विद्यार्थी मतदान करतात.  

1968 मध्ये शाळेचे सामाजिक विषयाचे शिक्षक टॉम मॅकऍडम्स यांनी ही मॉक निवडणूक सुरु केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com