मस्क यांची पहिली पसंती भारतीयाला

‘सोशल मीडिया’द्वारे झालेल्या निवडीचा घटनाक्रम उलगडला
elon musk
elon musk
Summary

‘सोशल मीडिया’द्वारे झालेल्या निवडीचा घटनाक्रम उलगडला

ह्युस्टन : प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टेस्ला’(tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क (Elon Musk)हे आपल्या कंपनीमध्ये बुद्धीमान व्यक्तींची निवड करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबद्दलही ओळखले जातात. अशा पद्धतीने निवड केलेला पहिला कर्मचारी हा भारतीय होता, हे त्यांनी आज जाहीर केले. अशोक एल्लुस्वामी असे या भारतीय तंत्रज्ञाचे नाव असून मस्क यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ऑटोपायलट टीमसाठी अशोक यांची निवड केली होती.

elon musk
ब्रेकिंग ! मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा मोहोळ येथे भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी 

अशोक एल्लुस्वामी हे सध्या टेस्ला कंपनीतील ऑटोपायलट टीमचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. एलॉन मस्क यांच्याच एका व्हिडिओला सोशल मीडियावर रिप्लाय देताना त्यांनी अशोक यांच्या निवडीबाबत माहिती दिली. मस्क यांनी २०१५ मध्ये ट्विटरवर, ऑटोपायलट टीममध्ये काम करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. याद्वारे अशोक एल्लुस्वामी यांची सर्वप्रथम निवड करण्यात आली. ‘टेस्ला कंपनी ऑटोपायलट टीम सुरु करणार असल्याचे मी ट्विट केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून आलेल्या अर्जातून मी सर्वप्रथम अशोक यांची निवड केली,’ असे ट्विट मस्क यांनी आज केले.

‘टेस्ला’मध्ये काम सुरु करण्यापूर्वी अशोक यांनी वॅबको व्हेईकल कंट्रोल सिस्टीम आणि फोक्सवॅगन इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबमध्ये काम केले होते. चेन्नईमधून इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर रोबोटिक्स सिस्टीम डेव्हलपमेंट या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.

elon musk
‘दहशतवादी ठार केला, मृतदेह घेऊन जा’; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला संदेश

भरतीसाठी नवे ट्विट

एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील (एआय) अभियंत्यांच्या निवडीसाठी ट्विटरवर नुकतेच आवाहन केले आहे. ‘एआय’चा वापर करून दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यास उत्सुक असलेल्यांनी अर्ज करावा, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी एक लिंकही दिली आहे. इच्छुक उमेदवारांना केवळ आपले नाव, ईमेल, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर किंवा एआय क्षेत्रात केलेले उल्लेखनीय काम इतकीच माहिती पीडीएफ स्वरुपात पाठवायची आहे.

elon musk
गलवान खोऱ्यात झेंडा फडकावत चीनची कुरघोडी; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

माझ्या संभाव्य कर्मचाऱ्यामध्ये इतरांमध्ये सहसा आढळून न येणारी क्षमता मी शोधत असतो. माझ्याकडे काम करण्यासाठी कोणत्याही पदवीचीच काय, पण महाविद्यालयीन शिक्षणाचीही अट नाही.

- एलॉन मस्क (२०१४ मधील मुलाखतीमधील विधान)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com