मुलांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेहून 'ते' गेले पाणीबुडी घेऊन

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

इलॉन यांनी तयार केलेल्या पाणबुडीला चारही बाजूने ऑक्सिजनचे टॅंक बसवण्यात आले आहेत. ही पाणबुडी दोन माणसांना उचलता येईल एवढी हलकी असून अरुंद जागेतूनही वाट काढू शकेल. या पाणबुडीवर ते गेल्या काही दिवसांपासून काम करत असून या बद्दलची सर्व माहिती ते ट्विटरद्वारे देत होते.  

चियांग राइ : अंतराळात वापरली जाणारी उपकरणे तयार करणाऱ्या अमेरिकातील टेस्ला कंपनीचा मालक इलॉन मस्क यांनी नुकतेच थायलंडमधील लुआंग नांग नोन या गुहेला भेट दिली. या गुहेत अडकेल्या ११ ते १६ वयोगटातील मुलांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वत: तयार केलेली लहान मुलांच्या आकाराची पाणबुडी तेथे ठेवली आहे. 

जवानांकडून सुरु असलेल्या बचाव कार्यात मदत व्हावी यासाठी त्यांनी ही पाणबुडी तयार केली असून या पाणबुडीला गुहेत अडकलेल्या मुलांच्या फुटबॉल संघाचे 'वाईल्ड बोअर' हे नाव देण्यात आले आहे.

23 जून रोजी ११ ते १६ वयोगटातील 12 मुलांचा फुटबॉल संघ आणि त्यांचे प्रशिक्षक गुहेत अडकले होते. त्यातील चार मुलांना शनिवारी तर चार मुलांना रविवारी सुखरुप बाहेर काठण्यात जवानांना यश आले. मात्र अजूनही चार मुले आणि त्यांचे प्रशिक्षक यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

इलॉन यांनी तयार केलेल्या पाणबुडीला चारही बाजूने ऑक्सिजनचे टॅंक बसवण्यात आले आहेत. ही पाणबुडी दोन माणसांना उचलता येईल एवढी हलकी असून अरुंद जागेतूनही वाट काढू शकेल. या पाणबुडीवर ते गेल्या काही दिवसांपासून काम करत असून या बद्दलची सर्व माहिती ते ट्विटरद्वारे देत होते.

बचाव कार्यात काम करणाऱ्या जवानांकडून या पाणबुडीची वापर केला जाणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. मात्र भविष्यातही ही पाणबुडी उपयोगी पडेल या हेतूने इलॉन यांनी ही पाणबुडी येथे ठेवली आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elon Musk sends kid-size submarine' for trapped boys

टॅग्स