नेपाळमधील व्यापाऱ्यांना 'जीएसटी'तून सूट 

यूएनआय
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

यापूर्वी सेवा पुरवठादाराला परिवर्तनीय चलनात परदेशी व्यापाऱ्यांकडून पैसे मिळाले तरच 'जीएसटी' माफ केला जात असे. मात्र, सर्वसाधारणपणे भारतीय चलनातच व्यवसाय करणाऱ्या नेपाळी व्यापाऱ्यांना यामुळे अनेक अडचणी येऊ लागल्या. भारताकडून नेपाळमध्ये वाहतूक, विमान, जहाजाचे कंटेनर असे अनेक व्यवसाय पुरविले जातात.

काठमांडू (यूएनआय) : भारताकडून सेवा विकत घेताना भारतीय चलनात त्याचे मूल्य चुकविल्यास वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) न भरण्याची सवलत नेपाळ आणि भूतानमधील व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे याबाबत परिपत्रक जारी केले. 

यापूर्वी सेवा पुरवठादाराला परिवर्तनीय चलनात परदेशी व्यापाऱ्यांकडून पैसे मिळाले तरच 'जीएसटी' माफ केला जात असे. मात्र, सर्वसाधारणपणे भारतीय चलनातच व्यवसाय करणाऱ्या नेपाळी व्यापाऱ्यांना यामुळे अनेक अडचणी येऊ लागल्या. भारताकडून नेपाळमध्ये वाहतूक, विमान, जहाजाचे कंटेनर असे अनेक व्यवसाय पुरविले जातात. याशिवाय सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञानासंबंधी विविध उत्पादने व सेवांचाही भारताकडून नेपाळला पुरवठा होतो. "जीएसटी' लागू झाल्यापासून या सर्व सेवा नेपाळमधील व्यापाऱ्यांना महाग पडू लागल्या. केवळ परिवर्तनीय चलनात व्यवहार करणाऱ्या परदेशी व्यापाऱ्यांना जीएसटी माफ असल्याने भारतीय चलनात व्यवसाय करणाऱ्या नेपाळ आणि भूतानमधील व्यापाऱ्यांवर यामुळे "जीएसटी'चा अतिरिक्त भार पडू लागला होता. याबाबत नेपाळ सरकार आणि तेथील व्यापाऱ्यांनी "जीएसटी' रद्द करण्याची मागणी केली होती. 
 

Web Title: esakal news GST rule for traders from nepal