आईच्या जिद्दीला सलाम! प्रसूतीनंतर अवघ्या तिसाव्या मिनिटाला दिली परिक्षा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

बाळाच्या जन्मानंतर तिसाव्या मिनिटाला एक नाही दोन नाही तर तब्बल तीन विषयांची परिक्षा देणारी आई पाहिली आहे का? इथियोपियामध्ये केवळ 21 वर्षांच्या अलमाझ हिने अचाट जिद्दीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. 

बाळाच्या जन्मानंतर तिसाव्या मिनिटाला एक नाही दोन नाही तर तब्बल तीन विषयांची परिक्षा देणारी आई पाहिली आहे का? इथियोपियामध्ये केवळ 21 वर्षांच्या अलमाझ हिने अचाट जिद्दीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. 

अलमाझला बाळ होण्याआधीच तिची परिक्षा होऊन जाणं अपेक्षित होतं मात्र, रमजानमुळे त्यांची परिक्षा पुढे ढकलण्यात आली. तिला सोमवारी (ता.10) परीक्षेपूर्वी काही वेळच तिला प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, पदवी मिळविण्यासाठी तिला आणखी एक वर्ष थांबणे मान्य नव्हते. म्हणूनच तिने तिच्या बाळाला जन्म दिल्यावर अवघ्या 30 मिनिटांत परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. 

Armed police guarding the room as Ms Derese sat the exam

तिला रुग्णालयातच परिक्षा देण्यासाठी तिच्या पतीने महाविद्यालयातून परवानगी काढली होती. त्यानुसार तिने रुग्णालयातच इंग्लिश, गणित आणि अम्हारिक या विषयांची परिक्षा दिली. आता उरलेली परिक्षा ती येत्या दोन दिवसांत देणार आहे. 

''मला परीक्षेा बसायची इच्छा होती म्हणूनच माझी प्रसूती होताना मला जास्त वेदना जाणवल्याच नाहीत. माझी परिक्षा चांगली गेली आणि माझा मुलगाही सुखरुप आहे,'' अशा शब्दांत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ethiopian woman takes final exams 30 minutes after giving birth