युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा लवकरच भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींशी करणार द्विपक्षीय चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ursula Von Der Leyen

हा भारत दौरा रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचं समजतंय.

Ursula Leyen : युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा लवकरच भारत दौऱ्यावर

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन (Ursula Von Der Leyen) या 24 ते 25 एप्रिल दरम्यान भारताला अधिकृत भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिलीय. युरोपियन आयोगाचे (European Commission) अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत भारत भेटीवर द्विपक्षीय चर्चा करतील, असं मंत्रालयानं म्हंटलंय. त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इतर मान्यवरांचीही भेट घेणार असल्याचं समजतंय.

मंत्रालयानं सांगितलं की, उर्सुला यांना यंदाच्या रायसीना संवाद (Raisina Dialogue) कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलंय. 25 एप्रिलला त्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील, असं वृत्त आहे. परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांची ही भेट युरोपियन (European Union) संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची आणि बहुआयामी भागीदारी अधिक घट्ट करण्याची संधी आहे. यादरम्यान भारत आणि युरोपियनमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट होण्याची शक्यता आहे. राजकीय आणि धोरणात्मक, व्यापार आणि वाणिज्य, हवामान आणि शाश्वतता, डिजिटल आणि तंत्रज्ञान ही भागीदारी मजबूत करण्याचा त्यांचा मानस आहे. हा भारत दौरा रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचं समजतंय.

हेही वाचा: ..तर भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण

रायसीना डायलॉग म्हणजे काय?

रायसीना डायलॉगची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. या परिषदेत भू-राजकीय आणि भू-आर्थिक विषयांवर चर्चा केली जाते. रायसीना डायलॉगचं आयोजन भारताचं परराष्ट्र मंत्रालय (Indian Ministry of External Affairs) आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (Observer Research Foundation) यांनी संयुक्तपणे केलंय. या परिषदेत विविध देशांचे परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थमंत्रीही सहभागी होतात. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनची स्थापना 1990 मध्ये झाली होती आणि ती दिल्लीत अस्तित्वात असलेली एक स्वतंत्र थिंक टँक आहे.

Web Title: European Commission Ursula Von Der Leyen Will Visit India On 24 25 April

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modi
go to top