प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना जगवण्यासाठी कसरत

Tiger
Tiger

बांडुंग (इंडोनेशिया) - कोरोना जागतीक साथीमुळे इंडोनेशियातील एका प्राणी संग्रहालयासमोर प्राण्यांना जगविण्यासाठी गंभीर समस्या निर्माण झाली असून त्यावर तितकाच गंभीर इलाज शोधणे प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांना भाग पडले आहे. वाघ, बिबट्या अशा मोठ्या प्राण्यांना जगविण्यासाठी हरिण, हंस अशा छोट्या प्राण्यांची कत्तल करावी लागण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते आणि त्यासाठी त्यांनी आपल्या मनाची तयारी केली आहे.

इंडोनेशियातील बांडूंग प्राणी संग्रहालयात ८५० प्राणी असून हे संग्रहालय जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र समजले जाते. या ठिकाणी अस्तित्व धोक्यात आलेला सुमात्रा जातीचा वाघ हा आकर्षणाचे मुख्य केंद्र असून इतर वेगवेगळ्या प्रजाती असल्याने हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले असते. त्यामुळे सातत्याने भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे प्राणिसंग्रहालयाची कमाई ही दरमहा १.२ अब्ज रुपये (८१ हजार ७४४ डॉलर) इतकी आहे. मात्र, कोरोनाच्या प्रभावामुळे २३ मार्चपासून प्राणिसंग्रहालय बंद ठेवणे भाग पडल्याने प्राणिसंग्रहालयासमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सध्या या प्राणी संग्रहालयाला देणगी दारांवरच अवलंबून राहवे लागत असून देणगी देणाऱ्यांना येथे प्रवेश दिला जात आहे. त्या साठी विशेष नियमावलीही लागू करण्यात आली आहे.

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

दरम्यान, येथील ओरांगउतानची देखभाल करणाऱ्या एइप सैपुदीन यांच्या निरीक्षणानुसार दुर्मीळ बनलेल्या माकडांच्या प्रजाती संतप्त होऊन हाताला लागेल ती वस्तू फेकू शकतात. 

अन्न संपले तरी त्यांना अजूनही भूक लागलेली असते असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तर, इंडोनेशियन प्राणिसंग्रहालय संघटनेतर्फे देशाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्याकडे मदतीची मागणी करण्यात आली असून इंडोनेशियातील ६० पैकी ९२ टक्के प्राणिसंग्रहालये मे महिन्याअखेरच प्राण्यांना अन्न देण्याच्या स्थितीत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद करताना त्यानंतर प्रश्न गंभीर बनण्याची भिती असल्याचे सांगितले.

दृष्टिक्षेपात

  • या प्राण्यांचा आहार नेहमीपेक्षा कमी करणे अटळ
  • जुलैमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे
  • अस्तित्व धोक्यात आलेला सुमात्राचा वाघ आकर्षण
  • वाघाला एरवी दोन दिवसांसाठी दहा किलो मांस दिले जात होते.
  • यांत दोन किलो घट करणे भाग
  • विविध प्राण्यांसाठी रोजची गरज : ४०० किलो फळे व १२० किलो मांस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com