Blast In Istanbul: तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये गर्दीच्या ठिकाणी स्फोट, 6 ठार, 53 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

explosion hits turkeys busy street in istanbuls taksim square several injured

Blast In Istanbul: तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये गर्दीच्या ठिकाणी स्फोट, 6 ठार, 53 जखमी

Blast In Istanbul: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलच्या तकसीम स्क्वेअर (Taksim Square)मध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये सहा जण ठार तर एकूण 53 जण जखमी झाले. रविवारी (13 नोव्हेंबर) इस्तंबूलच्या सर्वाधिक गजबजलेल्या भागात हा स्फोट झाला, त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

स्फोटानंतर रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, स्फोटानंतर परिसर रिकामा करण्यात आला

व्हिडिओमध्ये स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचे दिसत आहे. स्थानिक वृत्तानुसार, 4:15 वाजता (तुर्की वेळ) हा स्फोट झाला. तुर्कस्तानमध्ये झालेला हा स्फोट पहिला नाही. याआधीही 2017 आणि 2015 मध्ये इस्लामिक स्टेट आणि काही कुर्दिश गटांनी येथे स्फोट घडवून आणले होते.

टॅग्स :Turkey