काबूलमधील स्फोटात किमान 29 ठार...

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

नवरोझचा हा सण अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे. या सणानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिक एकत्र आले आहेत. स्फोट झाल्याचे ठिकाण हे नागरिकांमधील लोकप्रिय ठिकाण आहे. तेव्हा या ठिकाणी घडविण्यात आलेला हा स्फोट योगायोग नक्कीच नाही

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील प्रसिद्ध अल अबद रुग्णालय आणि काबूल विद्यापीठानजीक घडविण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये किमान 29 मृत्युमुखी; तर 18 जखमी झाले.

अफगाणिस्तानामध्ये नवरोझ सण साजरा केला जात असतानाच हा हल्ला घडविण्यात आला आहे. 2018 मध्ये घडविण्यात आलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांत केवळ काबूलमधीलच 200 पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानमधील नाजूक परिस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

""नवरोझचा हा सण अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे. या सणानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिक एकत्र आले आहेत. स्फोट झाल्याचे ठिकाण हे नागरिकांमधील लोकप्रिय ठिकाण आहे. तेव्हा या ठिकाणी घडविण्यात आलेला हा स्फोट योगायोग नक्कीच नाही,'' अशी माहिती अफगाणिस्तानमधील सुरक्षा तज्ज्ञ हबीब वर्डक यांनी दिली.

या हल्ल्याची  जबाबदारी इस्लामिक स्टेट ( इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हा कारबॉंब असण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: explosion in kabul; 29 dead