येमेनमधील हल्ल्यात 60 कैदी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने आज येमेनमधील होदैदा शहरातील एका तुरुंगावर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये तुरुंगातील काही कैद्यांसह साठ जणांचा मृत्यू झाला

साना - सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने आज येमेनमधील होदैदा शहरातील एका तुरुंगावर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये तुरुंगातील काही कैद्यांसह साठ जणांचा मृत्यू झाला.

हल्ला झाला त्या वेळी तुरुंगामध्ये 84 कैदी होते. या शहरावर हौथी बंडखोरांचा ताबा असल्याने येथे हल्ला करण्यात आला होता. येमेनचे अध्यक्ष अब्दरब्बू मन्सूर हादी यांच्या सरकारची पुनर्स्थापना करण्यासाठी मागील दीड वर्षापासून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली येथे हवाई हल्ले सुरू आहेत.

Web Title: explosion in yemen,60 dead

टॅग्स