व्यापार अडवणुकीबाबत 'जी-20'मध्ये चिंता व्यक्त

व्यापार अडवणुकीबाबत 'जी-20'मध्ये चिंता व्यक्त

ब्युनोस आयरेस (अर्जेंटिना) : जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) नियमांशी असुसंगत असलेल्या आणि केवळ स्वहित जपण्यासाठी व्यापार अडवणूक करण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल "जी-20' परिषदेतील सदस्य देशांनी आज चिंता व्यक्त केली. 
अर्जेंटिनाच्या राजधानीत सुरू असलेल्या या परिषदेमध्ये "जी-20'देशांचे कृषिमंत्री उपस्थित आहेत. आज यात संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत व्यापारातील अडथळे दूर करण्याचा निश्‍चय केला. 

आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराला अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाच्या झळा बसत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही परिषद झाल्याने व्यापारयुद्धाचे पडसाद येथे पडले. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर अतिरिक्त आयात कर लावल्यानंतर चीननेही अमेरिकेहून येणाऱ्या कृषी उत्पादनांवर जादा कर आकारले आहेत.

"आम्हाला केवळ स्वहित जपणारे उपाय नकोत, या मुद्यावर आम्ही परिषदेमध्ये कोणताही आडपडदा न ठेवता चर्चा केली. कोणत्याही एका देशाने जरी डब्लूटीओचे नियम पाळले नाहीत, तर काय होते, हे आपण पाहिले आहे. यामुळे इतरांबरोबर त्यांचेही नुकसान होते,' असे जर्मनीच्या कृषिमंत्री ज्युलिया क्‍लोकनर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com