कुरेशींकडे पुन्हा पाकचे परराष्ट्र मंत्रालय 

मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

इस्लामाबाद (यूएनआय) : पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी आज झालेल्या समारंभात पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी नवनियुक्त मंत्र्यांना शपथ दिली. या वेळी पंतप्रधान खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 16 मंत्री आणि पाच सल्लागारांच्या नावांची सत्ताधारी पाकिस्तान तेहरिके इन्साफ (पीटीआय) पक्षाकडून रविवारी घोषणा करण्यात आली होती.

पीटीआयचे उपाध्यक्ष मखदूम शाह मेहमूद कुरेशी यांनी पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री म्हणून शपथ घेतली. 2008 ते 2013 या काळात पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारच्या काळात कुरेशी यांच्याकडेच परराष्ट्रमंत्रिपद होते. 

इम्रान सरकारमधील नवे मंत्री 
- मखदूम शाह मेहमूद कुरेशी : परराष्ट्रमंत्री 
- असद उमर : अर्थमंत्री 
- परवेझ खट्टक : संरक्षणमंत्री 
- फवाद चौधरी : माहिती आणि प्रसारणमंत्री 
- गुलाम सरवार खान : पेट्रोलियममंत्री 
- डॉ. शिरीन मझारी : मानवी हक्कमंत्री 
- शफ्कत मेहमूद : शिक्षणमंत्री 
- मखदूम खुस्रो बख्तियार : जलस्रोतमंत्री 
- अमीर मेहमूद कियानी : आरोग्यमंत्री