केंब्रिज ऍनालिटिका : डेटा चोरीची फेसबुकला होती माहिती

Mark_Zuckerberg
Mark_Zuckerberg

लंडन - केंब्रिज ऍनालिटिका कंपनीकडून फेबुकचा डेटा चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यामुळे फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. 2018 मध्ये लंडनस्थित पॉलिटिकल कन्सलटन्सी कंपनी केंब्रिज ऍनालिटिकाद्वारे फेसबुकचा डेटा लीक झाल्याचे समोर आले होते. यासाठी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी माफीही मागितली होती. ब्रिटनमधील वृत्तपत्र ऑब्झर्व्हरने दिलेल्या वृत्तानुसार, त्यावेळी झुकेरबर्ग यांनी आपल्याला चोरी झाल्याची माहिती नसल्याचे म्हटले होते. मात्र, फेसबुकला याची संपूर्ण माहिती होती असे ऑब्झर्व्हरने म्हटले आहे.

यासाठी फेसबुकचे बोर्ड सदस्य मार्क आंद्रेसीन आणि केंब्रिज ऍनालिटिकाचे अधिकारी क्रिस्तोफर वाईली यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या होत्या असेही ऑब्झर्व्हरने म्हटले आहे.

ऑब्झर्व्हरच्या वृत्तात दिलेल्या माहितीप्रमाणे, या बैठकीत केंब्रिज ऍनालिटिका फेसबुकच्या युजर्सचा डेटाचा कशा प्रकारे आणि कसा वापरेल या गोष्टीवर चर्चा झाली होती. या वृत्तानंतर अमेरिकी रेग्युलेटर्सने या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली आहे. 

केंब्रिज ऍनालिटिकाद्वारे फेसबुकच्या सुमारे 8.7 कोटी युजर्सचा डेटा चोरी केल्याचा खुलासा झाला होता. फेसबुकच्या या डेटा लीक प्रकरणी चौकशी करणाऱ्या फेडरल ट्रेड कमिशनने सांगितले होते की, फेसबुकने 2011मध्ये तयार झालेल्या सेफगार्ड युजर्स प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com