‘फेसबुक’ने बंद केली ५.४ अब्ज बनावट खाती

पीटीआय
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

यंदाच्या वर्षात आतापर्यंत ५.४ अब्ज बनावट सोशल मीडिया अकाउंट्‌स बंद केल्याचे ‘फेसबुक’ने जाहीर केले आहे. गैरप्रकार आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असून ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे ‘फेसबुक’ने स्पष्ट केले आहे.

सॅनफ्रान्सिस्को - यंदाच्या वर्षात आतापर्यंत ५.४ अब्ज बनावट सोशल मीडिया अकाउंट्‌स बंद केल्याचे ‘फेसबुक’ने जाहीर केले आहे. गैरप्रकार आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असून ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे ‘फेसबुक’ने स्पष्ट केले आहे. राजकीय अजेंडा राबविण्यासाठी काही व्यक्ती किंवा संघटना फेसबुकचा गैरवापर करत असल्याचे लक्षात आल्यावर या कंपनीने बनावट अकाउंट्‌स आणि गैरप्रकार रोखण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook closes 2.5 billion fake accounts

टॅग्स