केंब्रिज ऍनॉलिटिकाने तुमची माहिती चोरली?

वृत्तसंस्था
रविवार, 8 एप्रिल 2018

फेसबुकवर लवकरच उलगडा होणार

न्यूयॉर्क : फेसबुकवरील तुमच्या व्यक्तिगत माहितीचा केंब्रिज ऍनॉलिटिकाने गैरवापर केला असल्यास त्याची तपासणी लवकरच फेसबुकवर करता येणार आहे. फेसबुकच्या 2.2 अब्ज यूजरना सोमवारपासून (ता.8) त्यांच्या फीडमध्ये याबाबत नोटीस दिसणार आहे.

फेसबुकवर लवकरच उलगडा होणार

न्यूयॉर्क : फेसबुकवरील तुमच्या व्यक्तिगत माहितीचा केंब्रिज ऍनॉलिटिकाने गैरवापर केला असल्यास त्याची तपासणी लवकरच फेसबुकवर करता येणार आहे. फेसबुकच्या 2.2 अब्ज यूजरना सोमवारपासून (ता.8) त्यांच्या फीडमध्ये याबाबत नोटीस दिसणार आहे.

फेसबुकवर "तुमच्या माहितीचे संरक्षण' ही लिंक असणार आहे. या लिंकवर जाऊन यूजर कोणते ऍप वापरतात आणि या ऍपशी त्यांनी कोणती माहिती शेअर केली आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच, ऍपला देण्यात येणारा "थर्ड-पार्टी ऍक्‍सेस' यूजरला पूर्णपणे बंद करता येणार आहे. फेसबुकच्या 8.7 कोटी यूजरची व्यक्तिगत माहिती केंब्रिज ऍनॉलिटिकाने वापरल्याचा अंदाज आहे. अशा यूजरना या माहितीच्या वापराबाबत सविस्तर संदेश मिळणार आहे. व्यक्तिगत माहितीच्या चोरीचा सर्वाधिक फटका अमेरिकेतील यूजर आणि त्याखालोखाल फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि ब्रिटन या देशांमधील यूजरना बसला.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत केंब्रिज ऍनॉलिटिकाने फेसबुक यूजरच्या व्यक्तिगत माहितीचा गैरवापर केला. यावरून मोठा गदारोळ उडाल्यानंतर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी चुकीची कबुली देत माफीनामा जाहीर केला होता. तसेच, याची जबाबदारी स्वीकारत सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले होते.

फेसबुकवरील "डेटा लीक'
जगभरात : 8.7 कोटी
भारतात : 5.62 लाख

Web Title: facebook deta leack and cambridge analytica