5.6 लाखांहून अधिक भारतीयांचा डेटा केंब्रिज अॅनालिटिकाला शेअर

वृत्तसंस्था
Thursday, 5 April 2018

''फेसबुक डेटा लिकप्रकरणावर सांगितले, की ही 'मोठी चूक' असून, वैयक्तिकरित्या डेटा सुरक्षेवर लक्ष दिले गेले नाही. मला आणखी एक संधी द्या''.

- मार्क झुकेरबर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेसबुक

वॉशिंग्टन : फेसबुकवरील युजर्सचा वैयक्तिक डेटा शेअर केला जात असल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यानंतर फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता देशातील तब्बल 5 लाख 60 हजारांपेक्षा अधिक युजर्सचा वैयक्तिक डेटा केंब्रिज अॅनालिटिकाला शेअर केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

facebook images

याबाबत फेसबुकने सांगितले, की भारतातील 5 लाख 62 हजार 455 युजर्सची माहिती भारतातील राजकीय पक्षांना फार पूर्वीपासून देत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा डेटा त्यांच्या ग्राहकांना दिला जात असल्याचे सिद्ध झालेले नाही. मात्र, आता फेसबुकच्या तब्बल 5 लाख 62 हजार 455 युजर्सचा डेटा केंब्रिज अॅनालिटिकाला शेअर केला जात असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक डेटा लिकप्रकरणावर सांगितले, की ही 'मोठी चूक' असून, वैयक्तिकरित्या डेटा सुरक्षेवर लक्ष दिले गेले नाही. मला आणखी एक संधी द्या'', असे आवाहन झुकेरबर्ग यांनी त्यांच्या युजर्सना केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook leak Details of over 5 lakh Indian users may have been shared with Cambridge Analytica