esakal | 'आम्ही राजकीय पक्ष, विचार बघत नाही'; फेसबुककडून आलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

facebook statement over allegations of linking with bjp

फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय की, आम्ही भडकाऊ किंवा प्रक्षोभक भाषण देणाऱ्या व्हिडिओ किंवा कोणत्याही प्रकारच्या कंटेटला थांबवतो. आम्ही आमची धोरणं कोणता पक्ष किंवा विचार लक्षात घेऊन करत नाही.

'आम्ही राजकीय पक्ष, विचार बघत नाही'; फेसबुककडून आलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : प्रक्षोभक भाषणांबाबतच्या धोरणात, पक्षपातीपणा केल्याच्या आरोपानंतर आता फेसबुकडून त्यावर स्पष्टीकरण आलंय. आमची पॉलिसी कोणताही पक्ष बघून निर्णय घेत नाही. राजकीय पक्ष आणि धोरण लक्षात न घेता आम्ही आमची पॉलिसी आखली आहे, असं स्पष्टीकरण फेसबुकनं दिलयं.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे प्रकरण?
अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जरनलने फेसबुकवर पक्षपाती पणाचा आरोप केला आहे. भारतात फेसबुकने भाजप धार्जिणे निर्णय घेतल्याचा रिपोर्ट वॉल स्ट्रीट जरनलने प्रसिद्ध केलाय. त्यात भाजपच्या काही नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ फेसबुकनं दुर्लक्ष करून तसेच ठेवल्याचं उदाहरणासह स्पष्ट करण्यात आलंय. त्यावरून भारतात सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस पक्ष आमने-सामने आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विषयावर आगपाखड सुरू केली असून, सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 

काय आहे फेसबुकची भूमिका?
याबाबत फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय की, आम्ही भडकाऊ किंवा प्रक्षोभक भाषण देणाऱ्या व्हिडिओ किंवा कोणत्याही प्रकारच्या कंटेटला थांबवतो. आम्ही आमची धोरणं कोणता पक्ष किंवा विचार लक्षात घेऊन करत नाही. निष्पक्षपणा आणि अचूकता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले राहुल गांधी?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलंय. भाजप आणि आरएसएसने फेसबुक आणि व्हॉट्सअपवर ताबा मिळवला आहे. त्या माध्यमातून, द्वेष भावना आणि फेक न्यूज पसरवण्यात येत आहेत. निवडणुकांमध्ये प्रभाव टाकण्यासाठही याचा वापर केला जातो. अमेरिकी मीडियाच्या माध्यमातून सत्य समोर आलंय, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केलीय. 

भाजपकडून राहुल यांना प्रत्युत्तर
काँग्रेसच्या टीकेवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलंय. स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर प्रभाव टाकू न शकलेले लोक भाजप आणि आरएसएसवर सोशल मीडिया केंट्रोल करण्याचा आरोप करत आहेत. निवडणुकीपूर्वी फेसबुक आणि केंब्रिज ऍनालिटिका यांची जुळवा जूळव करताना तुम्हाला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं आणि आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात, असा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावलाय.