लिंक्‍डइनला देणार फेसबुक शह ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

रोजगाराच्या जाहिराती पेजवर; ऍडमिन अर्जही स्वीकारणार
न्यूयॉर्क :
'फेसबुक'वर पेज ऍडमिनिस्ट्रेटर लवकरच नोकरीची जाहिरात करण्यासोबत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारू शकणार आहेत. यामुळे लिंक्‍डइन या कंपनीला मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

याविषयी माहिती देताना फेसबुकचा प्रवक्ता म्हणाला, "फेसबुकवरील एकंदरीत चित्र पाहता अनेक छोटे व्यवसाय नोकरीच्या जाहिराती पेजवर देतात. पेज ऍडमिन रोजगाराच्या जाहिराती देतील आणि उमेदवारांकडून आलेले अर्जही स्वीकारतील याची चाचणी कंपनीकडून सुरू आहे.'' फेसबुकने ऑक्‍टोबरमध्ये लोकांना वस्तू व खरेदी विक्रीला परवानगी दिली होती. लोकांना जास्तीत जास्त जोडून ठेवण्यासाठी सोशल मीडिया साइट असलेल्या फेसबुककडून प्रयत्न सुरू आहेत. आता फेसबुक कंपन्यांना त्यांच्या पेजवर जाहिराती करण्यास देऊन आणखी निधी मिळवेल.

लिंक्‍डइन रोजगार देणारे आणि रोजगाराचा शोध घेणारे यांच्यात ऑनलाइन दुवा म्हणून काम करते. यावर कंपनीचे उत्पन्न अवलंबून आहे. रोजगार शोधणारे उमेदवार दरमहा शुल्क भरून त्यांची माहिती संकेतस्थळावर देतात. अनेक जण ही माहिती पाहून त्यांना रोजगाराची संधी देतात.

Web Title: Facebook threatens LinkedIn with job opening features