अमेरिकेत फेसबुकच्या पॉलिसीचा डोनाल्ड ट्रम्प यांनाही फटका!

वृत्तसंस्था
Sunday, 28 June 2020

मोठा आर्थिक फटका
बेन अँड जेरी तसेच डव्ह अशा ब्रँडचे व्यवस्थापन करणाऱ्या युरोपीय कंपनीने फेसबुकच्या व्यासपीठावर द्वेषमुलक आणि विघटनवादी वक्तव्यात मोडणाऱ्या जाहिरातींवर वर्षअखेरीस बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे फेसबुकच्या रोख्यात आठ टक्के घसरण झाली असून बाजारी मूल्यानुसार ५० अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. कोका कोलानेही या बहिष्कारात ३० दिवस सहभागी होऊ, अशी घोषणा केली आहे.

न्यूयॉर्क - बातमीचे मूल्य असलेल्या, मात्र नियम मोडणाऱ्या सर्व पोस्ट ध्वजांकित केल्या जातील आणि यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा अपवाद असणार नाहीत असे फेसबुकने जाहीर केले आहे. याआधी फेसबुकने ट्रम्प यांच्या पोस्टवर कारवाई करण्यास नकार दिला होता. ट्वीटरने मात्र वस्तुस्थिती पडताळणी करावी (गेट द फॅक्ट्स) असे चिन्ह परखडपणे लावले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारपर्यंत फेसबुकने ट्रम्प यांच्या तशा आशयाच्या पोस्टवर कोणतेही चिन्ह लावले नव्हते. त्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधकांसह फेसबुकच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनीही टीकेची झोड उठविली होती. यानंतर मात्र ट्रम्प एखादी पोस्ट करतील तेव्हा त्यांनी नियम मोडला असल्यास फेसबुक कारवाई करेल आणि त्याद्वारे ट्रम्प यांच्याशी सामना होणे जवळपास अटळ आहे.

पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली; लष्कराने हॉस्पिटलना दिले आदेश 

वस्तुस्थितीचा वेध घेईल आणि देशभर त्यांचे चित्र काय आहे हे दाखविणारे धोरण आम्ही अंमलात आणत आहोत, असे फेसबुकने सांगितले. मतदानाशी संबंधित सर्वच पोस्टवर नवी चिन्हे टाकली जातील. युजर्स विश्वासार्ह माहितीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे वळतील. खोट्या दाव्यांवरही बंदी घातली जाईल.

निवडणूकीआधी ७२ तास स्थानिक  मतदानाच्या स्थितीबाबचे खोटे दावेही काढून टाकले जातील.

खरेदी करून 20 मिनिटं होण्याआधी कोट्यवधींच्या कारची अशी झाली अवस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebooks policy in the US also hit Donald Trump