'हा' देश उपासमारीच्या मार्गावर! UN च्या रिपोर्टमधून समोर

north korea
north koreaesakal

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या (united nations) एका अहवालात (UN report) हा दावा करण्यात आला आहे की, मोठ्या देशाशी शत्रुत्व आणि महागड्या अण्वस्त्र चाचण्या घेणारा हा देश... मात्र या देशातील जनता उपासमारीसारख्या संकटाला तोंड देत आहे. कोविड -19 चा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे आणि जागतिक संबंध बिघडल्यामुळे 'हा' देश आज गंभीर उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यामुळे लोकं आत्महत्या करण्यास हतबल झाली आहेत. . कोणता आहे हा देश....

लोकं आत्महत्या करत असून देश सोडून पळून जात आहेत.

टॉमस ओजिया क्विंटाना यांनी यूएन जनरल असेंब्लीच्या मानवाधिकार समितीला आणि आधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले की उत्तर कोरिया अन्न संकटाचा सामना करत आहे. लोकांच्या जीवनमानावर परिणाम झाला असून मुले आणि वृद्धांना उपासमारीचा धोका आहे. डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (DPRK) ने साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सीमा बंद केल्या, ज्याचा उत्तर कोरियाच्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला, कारण देशात आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय पुरवठ्याचा अभाव आहे. कोविड -19 रोखण्यासाठी डीपीआरके सरकारच्या या आत्मघातकी पावलामुळे लोक आत्महत्या करत असून देश सोडून पळून जात आहेत. ते म्हणाले की राजकीय कैद्यांच्या छावण्यांमध्ये अन्नधान्याच्या तुटवड्याबद्दल ते "खूप चिंतित" आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

north korea
वानखेडेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी NCBचं पथक उद्या येणार मुंबईत

मूलभूत गरजांसाठी संघर्ष

डीपीआरकेमध्ये मानवाधिकारांवरील संयुक्त राष्ट्राचे विशेष अन्वेषक म्हणून सहा वर्षांनंतर महासभेला दिलेल्या त्यांच्या अंतिम अहवालात क्विंटाना म्हणाले, की "हालचालीच्या स्वातंत्र्यावरील निर्बंध आणि राष्ट्रीय सीमा बंद केल्याने बाजारपेठा विस्कळीत झाले आहेत, ज्यामुळे लोकांना अन्नासोबत मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com