'एफबीआय'ला निर्णयाचे स्वातंत्र्य

पीटीआय
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या कथित ई-मेल गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी करण्याच्या अमेरिकेच्या मध्यवर्ती तपास संस्थेच्या (एफबीआय) प्रमुखांच्या निर्णयावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास व्हाइट हाउसतर्फे नकार देण्यात आला. एफबीआयचे प्रमुख जेम्स कॉमे यांनी क्‍लिंटन यांच्याशी संबंधित ई-मेल गैरव्यवहाराची पुन्हा तपासणी करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. अमेरिकी कॉंग्रेसच्या सदस्यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना कॉमे यांनी मागील आठवड्यात ही माहिती दिली आहे.

वॉशिंग्टन - अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या कथित ई-मेल गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी करण्याच्या अमेरिकेच्या मध्यवर्ती तपास संस्थेच्या (एफबीआय) प्रमुखांच्या निर्णयावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास व्हाइट हाउसतर्फे नकार देण्यात आला. एफबीआयचे प्रमुख जेम्स कॉमे यांनी क्‍लिंटन यांच्याशी संबंधित ई-मेल गैरव्यवहाराची पुन्हा तपासणी करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. अमेरिकी कॉंग्रेसच्या सदस्यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना कॉमे यांनी मागील आठवड्यात ही माहिती दिली आहे. ई-मेल गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी करण्याच्या एफबीआयच्या निर्णयावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास व्हाइट हाउसचे माध्यम सचिव जॉश अर्नेस्ट यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, एफबीआय प्रमुखांच्या निर्णयावर मी टीकाही करणार नाही किंवा त्याचे समर्थनही करणार नाही. या प्रकरणाच्या तपासाबाबत एफबीआयच्या प्रमुखांनी लोकांना कुठल्या पद्धतीने संवाद साधावा, याचे त्यांना स्वातंत्र्य आहे.

एफबीआयच्या प्रमुखांच्या कार्यक्षमतेवर अध्यक्ष ओबामा यांचा पूर्ण विश्‍वास असून, त्यांच्या निर्णयात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याची ओबामा यांची इच्छा नाही, असे ही अर्नेस्ट यांनी सांगितले.

ई-मेल गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी करण्याच्या एफबीआयच्या निर्णयाचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेशी संबंधित प्रतिनिधींनी स्वागत केले आहे. अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होत असून, त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला महत्व प्राप्त झाले आहे. ई-मेल गैरव्यवहार प्रकरणावरून क्‍लिंटन यांच्यावर विरोधकांकडून वारंवार टीका केली जात आहे.

कोणाला फायदा, कोणाला तोटा?
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रिपदी असताना क्‍लिंटन यांनी सरकारी आणि गोपनीय माहिती पाठविण्यासाठी खासगी ई-मेल सर्व्हरचा उपयोग केला असल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी एफबीआयने यापूर्वी चौकशीही केली होती. आता पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे एफबीआयने स्पष्ट केल्याने या प्रकरणाचा क्‍लिंटन यांना कितपत तोटा होऊ शकतो; तसेच ट्रम्प यांना किती फायदा होऊ शकतो याबाबत सध्या अमेरिकेत चर्चा सुरू आहे.

Web Title: fbi freedom of decision by white house