विमानाला आग लागल्याने 41 प्रवाशांचा मृत्यू 

विमानाला आग लागल्याने 41 प्रवाशांचा मृत्यू 

मॉस्को : मॉस्को विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरलेल्या विमानाला आग लागल्याने 2 मुलांसह 41 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना भारतीय वेळेनुसार रविवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी या दुर्घटनेबद्धल शोक व्यक्त केला आहे.

एरोफ्लोटच्या सुखोई सुपरजेट 100 विमानात 78 प्रवासी होते. हे विमान मॉस्कोच्या शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अपघातग्रस्त विमान रशियाच्या पश्‍चिमेकडील शहर मुमेन्स्ककडे जात होते. सोशल मीडियावर विमान दुर्घटनेचे दृश्‍य पाहवयास मिळत आहे.

धावपट्टीवर उतरताच विमानाच्या मागील बाजूस भयंकर आग लागल्याचे दिसते. विमान थांबल्यानंतर आपत्कालीन दरवाजातून प्रवासी उड्या मारतानाही दिसतात. दुर्घटनाग्रस्त विमानातील 37 जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. त्यात 11 जण जखमी झाले आहे. जखमींना तीन रुग्णालयांत दाखल केले आहेत. त्याचबरोबर अन्य एका व्हिडिओत विमान उतरताना अनेकदा उसळी घेताना दिसून येते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपासयंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येते. पंतप्रधान दिमित्रि मेदवेदेव यांनी चौकशीसाठी समिती नेमली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com