चक्क संपूर्ण हॉटेल सोन्याचं; जाणून घ्या एका रात्रीचं भाडं

पीटीआय
Sunday, 5 July 2020

सोन्याचे आकर्षण सर्वांनाच असते. आजघडीला सोन्याचा भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले असताना दुसरीकडे मात्र व्हियतनामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा वापर करुन आलिशान हॉटेल उभारले आहे. डोळे दिपून टाकणाऱ्या या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेशद्वारापासून बाथटबपर्यंत सर्वकाही सोन्याचे आहे. एकीकडे कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत असताना व्हियतनामध्ये हे महागडे हॉटेल सुरू होत आहे.

हनोई - सोन्याचे आकर्षण सर्वांनाच असते. आजघडीला सोन्याचा भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले असताना दुसरीकडे मात्र व्हियतनामध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा वापर करुन आलिशान हॉटेल उभारले आहे. डोळे दिपून टाकणाऱ्या या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेशद्वारापासून बाथटबपर्यंत सर्वकाही सोन्याचे आहे. एकीकडे कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत असताना व्हियतनामध्ये हे महागडे हॉटेल सुरू होत आहे. डोल्स हनोई गोल्ड लेक असे या हॉटेलचे नाव असून ते ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हियतनामच्या श्रीमंतीत भर टाकणारे भव्यदिव्य असे सोनेरी हॉटेल हनोईच्या जिआंग वो लेक येथे साकारले आहे. हॉटेलच्या सर्वात वरील भागात इनफिनिटी पूल उभारला असून तेथून संपूर्ण हनोई शहराचे सौंदर्य न्याहळता येऊ शकते. हॉटेलची लॉबी २४ कॅरेट सोन्याने तयार केली आहे. यासाठी २० कोटी डॉलरचा खर्च आला आहे. मात्र हा खर्च इथेच थांबत नाही तर हॉटेलमधील स्विमिंग पूल, खोल्या, भांडी, चहा कप, प्लेट, शॉवर हेड आणि टॉयलेटला देखील सोन्याचा मुलामा दिला आहे. पाहुण्यासाठी कॉफी सोन्याच्या कपमधून येते आणि त्यांचे स्नान देखील चमकदार सोन्याच्या शॉवरमधून होते. या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी सुमारे ४ लाख ८५ हजार रुपये मोजावे लागतील.

Image may contain: 1 person

....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक

आग्नेय आशियातील सर्वात आलिशान आणि महागडे हॉटेल म्हणून या हॉटेलची ओळख निर्माण झाली आहे. हॉटेल व्यवस्थापनाचे अध्यक्ष हू दोंग यांच्या मते, त्यांच्या समूहाच्या एका कारखान्यात गोल्ड प्लेट तयार करण्याचे काम होते. सर्वत्र सोन्याचाच वापर झाल्याने फर्निचर आणि अन्य गोष्टींवर खर्च कमी आला आहे. जगभरात कोरोना संसर्गामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम झालेला असताना या हॉटेलवर मात्र हा आजार अडथळा बनला नाही. आगामी काळात हॉटेलची जबरदस्त कमाई होईल, असा विश्‍वास व्यवस्थापनाला आहे. या हॉटेलमध्ये सोन्याचा किती वापर झाला आहे, हे मात्र गुपित ठेवले आहे. परंतु त्याचा अंदाज बांधणे देखील कठिणच आहे.

हॉटेलचे अन्य वैशिष्ट्ये

  • हॉटेलमध्ये सर्वात वरच्या बाजूस फ्लॅटही विक्रीस उपलब्ध
  • संपूर्ण हॉटेल चोवीस कॅरेटच्या साकारले
  • हॉटेल पूर्ण होण्यास अकरा वर्षाचा कालावधी
  • जेवणातही वैशिष्ट्येपूर्ण सोन्याचे मिश्रण
  • सहा प्रकारच्या खोल्या/सूट 
  • सोन्यामुळे मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे सोन्याचा अधिकाधिक वापर
  • चोवीस तास गेमिंग क्लब
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find out the whole hotel gold one night rent