
Indonesia Fire: इंडोनेशियात इंधन डेपोला भीषण आग, 14 जणांचा होरपळू मृत्यू
जकार्ता : इंडोनेशियात एका इंधन डेपोमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर डझनभर लोक गंभीर जखमी झाले आहेत. बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून अनेकांना बाहेर काढण्यात येत आहे. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Fire at fuel storage depot in Indonesia's capital kills at least 14)
अल अरेबिया न्यूजच्या माहितीनुसार, सरकारी इंधन डेपो आणि गॅस कंपनी असलेल्या 'पर्टामिना'च्या डेपोला ही भीषण आग लागली आहे. उत्तर जकार्ताजवळील तनाह मेराह या दाट लोकवस्तीजवळ असलेल्या या डेपोला आग लागल्याचं वृत्त आहे. या डेपोमधून संपूर्ण इंडोनेशियात सुमारे २५ टक्के इंधनाचा पुरवठा होतो.
१८० बंब घटनास्थळी दाखल
दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १८० अग्निशमनचे बंब आणि ३७ फायर इंजिन्स प्रयत्न करत आहेत. ज्वलनशील पदार्थ असल्यानं आगीच्या ज्वाळा खूपच उंचच उच उठल्या आहेत, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.