कॅलिफोर्निया - युट्युबच्या मुख्यालयात गोळीबार, हल्लेखोर महिला ठार 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

या हल्ल्यात तीनजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एक 36 वर्षीय तरूण हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून तो या हल्लेखोर महिलेचा मित्र असल्याचे समजते. या शिवाय या हल्ल्यात आणखी दोन महिलाही गंभीर जखमी झाल्या आहेत.  

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील युट्युबच्या मुख्यालयावर आज एका अज्ञात महिलेने हल्ला केला आहे. त्यानंतर ही महिलाही ठार झाल्याचे समजते. हल्ल्यानंतर तिने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. या महिलेने हल्ला का केला हे अद्याप समजू शकले नाही. 

youtube

या हल्ल्यात तीनजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एक 36 वर्षीय तरूण हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून तो या हल्लेखोर महिलेचा मित्र असल्याचे समजते. या शिवाय या हल्ल्यात आणखी दोन महिलाही गंभीर जखमी झाल्या आहेत.  

प्राथमिक तपासात ही महिला दक्षिण कॅलिफोर्नियातील असल्याचे समजते. तिने युट्युबच्या मुख्यालयावर गोळीबार केला याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.

यावेळी मुख्यालयात कर्मचारी काम करत होते. या घटनेनंतर त्यांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हवविण्यात आले असून, मुख्यालय रिकामे करण्यात आले आहे. पोलिसंना 911 या क्रमांकावर अनेक लोकांच्या गोळीबार होत असल्याच्या तक्रारी आल्या. पोलिसांनी त्वरेने घटनास्थळी जात हा परिसर रिकामा केला. इतर नागरिकांना परिसरात येण्यास अटकाव केला व पुढील तपासणी केली.   

Web Title: firing at you tube head quarter in California, suspect lady dies