कृष्णविवराचे प्रभामंडळ टिपण्यात शास्त्रज्ञांना यश; आजवरची अद्भूत घटना!

वृत्तसंस्था
Tuesday, 21 July 2020

स्वतःभोवती फिरणाऱ्या वायूच्या चकतीला गिळंकृत करत असतानाच या कृष्णविवराजवळ अतिउष्ण (अल्ट्राहॉट) कण साठले गेले. त्यातून प्रकाशमान "क्ष' किरणांचे प्रभामंडळ तयार झाले, की जे 30 कोटी प्रकाशवर्षे दूर पृथ्वीवर सुद्धा दिसू शकते.

पुणे : गुरुत्वाकर्षनामुळे ज्यातून प्रकाशही बाहेर पडत नाही, अशा कृष्णविवरांचे प्रभामंडळ टिपण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कृष्णविवरासंबंधी टिपण्यात आलेली ही आजवरची अद्भुत घटना असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. 

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था अर्थात नासाच्या शास्त्रज्ञांनी "1 ईएस 1927 + 654' या आकाशगंगेतील एका कृष्णविवराचे अध्ययन केले आहे. स्वतःभोवती फिरणाऱ्या वायूच्या चकतीला गिळंकृत करत असतानाच या कृष्णविवराजवळ अतिउष्ण (अल्ट्राहॉट) कण साठले गेले. त्यातून प्रकाशमान "क्ष' किरणांचे प्रभामंडळ तयार झाले, की जे 30 कोटी प्रकाशवर्षे दूर पृथ्वीवर सुद्धा दिसू शकते.

कोरोनामुळे आई जीव सोडत होती; तो खिडकीत बसून तिला शेवटचं पाहत होता​

Image may contain: night, outdoor and water

सुमारे दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये शास्त्रज्ञांनी या कृष्णविवरातून बाहेर पडणाऱ्या क्ष किरणांचा शंभर दिवस अभ्यास केला होता. क्षणार्धात लुप्त-विलुप्त होणारे हे प्रभामंडळ शंभर दिवसांनी आधीपेक्षा 20 पटींनी अधिक प्रकाशमान असल्याचे लक्षात आले आहे. ऍस्ट्रोफिजीकल जर्नल लेटरमध्ये नुकतेच यासंबंधीचे संशोधन प्रकाशित झाले आहे. 

सगळ्यांत आनंदाची बातमी; ऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोनावर लस शोधण्यात यश​

असे का घडले असावे? 
कृष्णविवराचे खाद्य असलेल्या वायूमंडळाचे बायप्रॉडक्‍ट म्हणून हे क्ष-किरणांच्या प्रभामंडळ तयार झाले आहे. प्रभामंडळ अंधूक किंवा पुन्हा तीव्र प्रकाशित होणे हे कृष्णविवराच्या खाद्याचा पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. कृष्णविवराजवळून जाणाऱ्या ताऱ्याचे तुकडे वायूमंडळाच्या चकतीला प्रभावित करत असल्यामुळे हे घडत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. 

Image may contain: night

कोरोना लस संशोधनात चिंपांझीची मदत; जाणून घ्या लस कशी काम करणार​

कृष्णविवराभोवती अशी अद्भुत घटना प्रथमच टिपण्यात आली आहे. प्रथमतः आमच्या निरीक्षणामध्ये चूक झाल्याचे आम्हाला वाटले, परंतु जेव्हा प्रत्यक्षात हे खरे असल्याचे लक्षात आले, तर आम्ही अचंबित झालो. कृष्णविवरासंबंधीच्या सैद्धांतिक संशोधनावर यामुळे अधिक प्रकाश पडणार आहे. 
- डॉ. क्‍लॉडिओ रिक्की, डिएगो पोर्टेल्स विद्यापीठ, चिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In First time astronomers watch a black holes corona disappear and then reappear