'यूएन'च्या इमारतीवर 'हॅपी दिवाळी'चा संदेश

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायमचे प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी यूएन मुख्यालयाच्या इमारतीचे छायाचित्र ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले.

न्यूयॉर्क - देशभर दिवाळीचा सण साजरा होत असतानाच आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) इमारतीवरही दिवाळीच्या शुभेच्छांचा संदेश देण्यात आला. इतिहासात प्रथमच यूएनतर्फे दिवाळी साजरी करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयाच्या इमारतीवर विद्युत रोषणाईने शनिवारी रात्री दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आजपासून तीन दिवस दिवाळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. याठिकाणी भारतीय सण साजरा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाचा सण याठिकाणी साजरा करण्यात आलेला नाही.

संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायमचे प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी यूएन मुख्यालयाच्या इमारतीचे छायाचित्र ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले. 

Web Title: first time diwali celebration in united nations