बांगलादेशात पाच दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

ढाका: बांगलादेशातील बंदी असलेली दहशतवादी संघटना जेएमबीच्या पाच दहशतवाद्यांना आज एका जपानी व्यक्तीच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली.

रंगपूरच्या एका न्यायालयाने जमातुल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) च्या पाच दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले. याप्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांची मुक्तता केली.

मे 2015 मध्ये बांगलादेशमध्ये आलेले कुनिओ होशी या जपानी नागरिकाची तीन ऑक्‍टोबर रोजी गोळी झाडून हत्या केली होती. त्यांनी रंगपूरच्या परिसरात शेती विकसित केली होती. होशी यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. याप्रकरणी जेएमबीच्या आठ दहशतवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यातील पाच जण तुरुंगात असून दोघांचा रंगपूरच्या तुरुंगात चकमकीत मृत्यू झाला होता. या प्रकरणातील अन्य दहशतवाद्यांना अजूनही अटक झालेली नाही.

Web Title: Five militants sentenced to death