प्रवाशाच्या गोंधळामुळे विमान दुसरीकडे वळविले

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे हे विमान लाहोरहून लंडनमधील हिथ्रो विमानतळाकडे जात होते.

लंडन : लंडनमधील हिथ्रो विमानतळाकडे जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाने गोंधळ घालण्यास सुरवात केल्यामुळे धोक्‍याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर हे विमान ब्रिटनच्या हवाई दलाच्या विमानांच्या देखरेखीत हिथ्रोऐवजी स्टॅंडस्टेड विमानतळावर उतरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे हे विमान लाहोरहून लंडनमधील हिथ्रो विमानतळाकडे जात होते.
हिथ्रोकडे जात असलेल्या विमानात एका प्रवाशाने गोंधळ घातल्यामुळे संबंधित विमान ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सच्या विमानांच्या देखरेखीत स्टॅंडस्टेड येथील विमानतळाकडे विळविण्यात आले.

या विमानतळावर संबंधित विमानाची आणि प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याचे विमान कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले. गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: flight diverted due to chaos of a passenger