सात प्रवाशांनी विमानात उभे राहून केला प्रवास!

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

कराची - पाकिस्तानमधील कराचीतून सौदी अरेबियाच्या दिशेने जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानात सात प्रवाश्‍यांनी उभे राहून प्रवास केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

कराची - पाकिस्तानमधील कराचीतून सौदी अरेबियाच्या दिशेने जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानात सात प्रवाश्‍यांनी उभे राहून प्रवास केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्रातील वृत्तानुसार 20 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. कराचीतून सौदी अरेबियातील मदिनाच्या दिशेने "पीके-743' या विमानाने उड्डाण केले होते. या विमानाची 409 प्रवाशांची क्षमता होती. मात्र प्रत्यक्षात विमानातून 416 प्रवासी प्रवास करत होते. अतिरिक्त सात प्रवासी हे विमानातील मधल्या जागेत उभे राहून प्रवास करत होते. अधिकृत यादीमध्ये अतिरिक्त प्रवाशांचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. तज्ज्ञांच्या मते, विमानातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास करणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असते. अतिरिक्त प्रवाशांकडे सीटबेल्ट नसल्याने त्यांच्याकडे ऑक्‍सिजन मास्कही नव्हते. आणीबाणीच्या काळात विमान सुरक्षितस्थळी उतरविताना ही बाब धोकादायक ठरू शकली असती.

"मी विमानाचे उड्डाण केले होते. विमानातील वरिष्ठ कर्मचाऱ्याने विमानाचे दार बंद करण्यापूर्वी अतिरिक्त प्रवाशांची बाब लक्षात आणून दिली नव्हती. त्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर तातडीने कराचीला परत जाणे शक्‍य नव्हते. उड्डाण घेतल्यानंतर तातडीने विमानाला उतरविण्यासाठी अतिरिक्त इंधन लागले असते. ते विमान कंपनीच्या हिताचे नव्हते', अशी माहिती विमानाचे कॅप्टन अनवर अदिल यांनी दिली.

Web Title: Flight from Pakistan had seven passengers stood in aisle