फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये गोळीबारात 2 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

फ्लोरिडा (अमेरिका)- येथील क्लब ब्लू नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार सोमवारी (ता. 25) पहाटे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम फ्लोरिडातील फोर्ट मायर्स येथील नाईट क्लबमध्ये अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळीबारामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, 17हून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ओरलँडो येथील नाईट क्लबमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारात 49 जण ठार झाले होते.

Web Title: Florida Night Club 2 killed in firing