फ्लोरिडात विमानतळावर गोळीबार; 5 ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने हल्ला का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यानंतर विमानतळ काहीवेळ बंद ठेवण्यात आले होते. हल्ल्यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांचे माजी सेक्रेटरी विमानतळावरच होते.

फ्लोरिडा - अमेरिकेतील फ्लोरीडातील फोर्ट लॉडरडेल विमानतळावर शुक्रवारी बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जण ठार झाले असून, आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगेत बंदुक घेऊन विमानतळावर हल्लेखोर पोहचला होता. स्वच्छतागृहात जाऊन त्याने बॅगेतून बंदुक काढत बाहेर आल्यानंतर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरवात केली. या गोळीबारात पाच जण ठार झाले असून, आठ जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने हल्ला का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यानंतर विमानतळ काहीवेळ बंद ठेवण्यात आले होते. हल्ल्यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांचे माजी सेक्रेटरी विमानतळावरच होते. टर्मिनल-2 च्या बॅगेज क्लेम एरियामध्ये ही घटना घडली. हल्ल्यानंतर विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Florida shooting: Gunman kills 5 people, wounds 8 at Ft. Lauderdale airport