पाकिस्तानच्या नियोजित पंतप्रधानांचा साध्या राहणीवर भर

Focusing on the simple living of Pakistan to be Prime Minister imran khan
Focusing on the simple living of Pakistan to be Prime Minister imran khan

इस्लामाबाद- पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान हे शपथविधीनंतर आलिशान पंतप्रधान निवासाऐवजी मिनिस्टर्स एन्क्‍लेव्हमध्ये राहण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार इस्लामाबाद येथील मिनिस्टर्स एन्क्‍लेव्हमधील एक घर पंतप्रधान निवास म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून इम्रान खान हे येत्या 11 ऑगस्टला शपथ घेणार आहेत. शपथ घेतल्यानंतर साध्या फ्लॅटमध्ये राहण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना मिनिस्टर्स एन्क्‍लेव्हमध्ये स्थानांतरित करण्यात येणार आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या इम्रान खान यांच्या पक्षाने पहिल्यापासूनच साधेपणावर भर दिला आहे. इम्रान खान यांनी आपल्या पहिल्याच भाषणात आलिशान घराचा वापर हा शैक्षणिक संस्थांसाठी किंवा अन्य सामाजिक उपक्रमासाठी केला जाईल, असे म्हटले होते. तसेच सरकारी उधळपट्टीवरही लगाम घालण्याचे सूतोवाच केले. सध्या इम्रान खान हे आपल्या खासगी बनीगाला हाउसमध्ये राहत आहेत. पाकिस्तानातील सर्वांत मोठे नेते म्हणून उदयास येणाऱ्या इम्रान खान यांच्या घराची सुरक्षा निवडणूक निकालानंतर वाढवण्यात आली. 

यादरम्यान, पाकिस्तानच्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांची भेट घेऊन निवासस्थानाच्या सुरक्षेविषयी चर्चा केली. सुरक्षेच्या कारणावरून इम्रान खान यांचे सध्याचे निवासस्थान हे पंतप्रधान हाउस म्हणून वापरता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इम्रान खान यांनी अन्य सुरक्षित ठिकाणी राहण्याची तयारी दर्शविली. त्यांनी आपल्याला राहण्यासाठी साधा फ्लॅट द्यावा, अशी मागणी केली होती, अखेर इस्लामाबादच्या मिनिस्टर्स एन्क्‍लेव्हमध्ये एका साध्या फ्लॅटमध्ये राहण्याची तयारी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com