चीनमध्ये विकले जातात भेसळयुक्त अन्नपदार्थ 

वृत्तसंस्था
रविवार, 25 डिसेंबर 2016

शांघाय : चीनमध्ये या वर्षी अन्नसुरक्षेत अनियमितता आढळल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून उघडकीस आली. याची व्याप्ती एवढी प्रचंड आहे, की 2016 च्या पहिल्या नऊ महिन्यांपर्यंत अन्नसुरक्षा गैरव्यवहाराची पाच लाख घटना घडल्याचे सांगण्यात आले.

चीनमधील अन्नसुरक्षा गैरव्यवहाराबाबत अधिकाऱ्यांनी शनिवारी माहिती दिली. यात धातूमिश्रित तांदूळ, हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे दूषित तेल, 2008 मध्ये औद्योगिक रसायनांचा समावेश लहान मुलांच्या खाद्यान्नात केला होता. चीनच्या अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख बी जिंगकुआन यांनी नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीपुढे बोलताना सांगितले, की अन्नपदार्थ क्षेत्रात चीनने लक्षणीय प्रगती केली असली तरी मूळ समस्या कायम आहेत.

यासंदर्भातील बी यांचा अहवाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. या वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांत सुमारे एक कोटी 50 लाख नमुन्यांचा सर्वे केला असता पाच लाख नमुने बेकायदा असल्याचे आढळून आले. यात खोट्या जाहिराती, नकली पदार्थांचा वापर, बनावट पदार्थांचा विक्री होत असल्याचे बी यांनी म्हटले आहे. चीनच्या ईशान्येकडील जिलीन प्रांतात औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनचा समावेश खाद्यपदार्थांमध्ये आढूळन आला. नैर्ऋत्येकडील ग्युझोऊ प्रांतात बनावट व दुय्यम प्रतीच्या मिठाची विक्री केली जात आहे, असे निरीक्षण अहवालात नोंदविले आहे.

Web Title: Food Safety violations in China