टिकटॉक विसरा; आता 'रिल्स' येतेय....

Reels
Reels

न्यूयॉर्क - चीनच्या विस्तारवादाविरोधातील लाटेत अनेक चिनी कंपन्यांबरोबरच टिकटॉक या लोकप्रिय ॲपवरही अमेरिका, भारतासारख्या देशांनी बंदी घातली. मात्र , या टिकटॉकला पर्याय लवकरच उपलब्ध होणार असून ''इन्स्टाग्राम''कडून ''रिल्स'' या नवीन ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोशल मीडियावरील वाढत्या स्पर्धेमुळे टिकटॉकच्या यशाचे विश्लेषण आधीच झाले आहे. टिकटॉकवर बंदी घालण्याची भाषा बोलली जात होती, त्याच वेळी नवीन ॲपच्या निर्मितीला वेग आला होता. टिकटॉकवरील बंदी नंतर ती पोकळी भरून काढणारा लोकप्रिय होणार यात शंका नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेऊन इन्स्टाग्रामने रिल्स हे टिकटॉकशीच मिळते जुळते ॲप तयार केले आहे. फ्रान्स, जर्मनी, भारत आणि ब्राझीलमध्ये प्रायोगिक तत्वावर त्याचा वापरही होत आहे. पुढील महिन्यात ते जगभरातील ५० देशांमध्ये सुरू करण्याचा इन्स्टाग्रामचा विचार आहे.

''रिल्स''च्या निर्मितीच्या सुरवातीच्या टप्प्यात ते फक्त इन्स्टाग्राम युजरपुरतेच मर्यादित होते. आता त्याला स्वतंत्र अस्तित्व देण्यात आले आहे.

रिल्सची वैशिष्ट्ये

  • १५ सेकंदापर्यंतचे छोटे व्हिडिओ रेकॉर्ड आणि एडिट करता येणार
  • पार्श्वसंगीतासाठी गाण्यांचा आणि संगीत रचनांचा प्रचंड साठा
  • अनेक प्रकारची फिल्टर्स
  • आपण पाहिलेल्या व्हिडिओमध्ये वापरलेली फिल्टर्स आपल्यालाही वापरता येणार.
  • काउंटडाउन टायमरद्वारे व्हिडिओचा वेग बदलता येणार
  • टिकटॉकमध्ये असलेली बहुतेक वैशिष्ट्ये रीलमध्येही असणार
  • रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करता येणार

आधीचा प्रयोग फसला
इन्स्टाग्रामची पालक कंपनी असलेल्या फेसबुकने आधीही छोटे व्हिडिओ तयार करून शेअर करण्यासाठी लेस्सो हे ॲप तयार केले होते. मात्र ते सपशेल अपयशी ठरले होते. आता मात्र टिकटॉकवरील बंदीचा त्यांना फायदा होऊ शकेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com