मुंबई हल्ल्याशी सईदचा संबंध नाही : मुशर्रफ

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुशर्रफ यांचा हा दावा असला तरी सईदचा मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याचे पुरावे भारताकडे असून, सईदवरही अमेरिकेने एक कोटी डॉलरचे इनाम जाहीर केले आहे.

इस्लामाबाद - जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याचा मुंबई हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता, असा दावा पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी केला आहे.

पाकिस्तानमध्ये सईदला दहशतवादीही मानत नसल्याचे ते म्हणाले. सईदला स्थानबद्ध केल्याबाबत बोलताना मुशर्रफ म्हणाले, की हाफीज सईद हा भारताने चर्चेत ठेवलेला मुद्दा आहे, अमेरिकेला याबाबत देणेघेणे नाही. तो मुंबई हल्ल्यात सहभागी नव्हता.

मुशर्रफ यांचा हा दावा असला तरी सईदचा मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याचे पुरावे भारताकडे असून, सईदवरही अमेरिकेने एक कोटी डॉलरचे इनाम जाहीर केले आहे. त्याच्या संघटनेलाही दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

Web Title: Former Pak President Pervez Musharraf Claims Hafiz Saeed Was Not Involved In Mumbai Attacks