
Imran Khan : इम्रान खान यांना लाहोर उच्च न्यायालयाचा दिलासा! 9 प्रकरणात जामीन मंजूर
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आठ दहशतवादी खटल्यांमध्ये संरक्षणात्मक जामीन मंजूर केला आहे. लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तारिक सलीम शेख आणि न्यायमूर्ती फारुख हैदर यांच्या दोन सदस्यीय खंडपीठासमोर दहशतवादाच्या कलमांखाली दाखल करण्यात आलेल्या खटल्यांविरोधात दाखल जामीन अर्जावर सुनावणी झाली.
इस्लामाबादमधील पाच खटल्यांसाठी २४ मार्चपर्यंत आणि लाहोरमधील तीन प्रकरणांसाठी २७ मार्चपर्यंत पीटीआय प्रमुख खान यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, इम्रान खान यांनी आपल्याविरोधात दाखल केलेल्या दिवाणी खटल्याच्या विरोधात दाखल केलेल्या जामीन अर्जावरही न्यायमूर्ती सलीम यांनी सुनावणी केली.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले अजामीनपात्र अटक वॉरंट १८ मार्चपर्यंत स्थगित केले असून, तोशखाना प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या जिल्हा न्यायालयात हजर राहण्याची परवानगी दिली आहे.
एलएचसीच्या निर्णयापूर्वी लाहोरच्या जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या निवासस्थानाजवळ तणावपूर्ण शांतता होती. दोन दिवस त्यांचे संतप्त समर्थक आणि पंजाब पोलिस यांच्यात जोरदार हाणामारी झाली. अखेर बुधवारी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा संघर्ष संपुष्टात आला.
भेटवस्तू खरेदी करून नफ्यासाठी विकण्याच्या नावाखाली तोशखाना नावाच्या सरकारी डिपॉझिटरीकडून सवलतीच्या दरात महागडे ग्रॅफ घड्याळ खरेदी केल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे.