नवाज शरीफ रुग्णालयात दाखल; प्रकृती खालावली

Former Pakistan PM Nawaz Sharif rushed to hospital after health deteriorates
Former Pakistan PM Nawaz Sharif rushed to hospital after health deteriorates

लाहोर : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शरीफ यांच्या रक्तातील रक्त पेशींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांचे वैयक्तिक डॉक्‍टर अदनान खान यांनी सोमवारी ट्‌विटच्या माध्यमातून दिली होती. आपण प्रशासनाकडे विनंती केल्यानंतर शरीफ यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही खान यांनी स्पष्ट केले. शरीफ यांच्या रक्तातील रक्तपेशींची संख्या मोठ्या संख्येने घटली आहे. त्यांना इतरही अनेक आजार आहेत. त्यामुळे शरीफ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक आहे, असे खान यांनी ट्‌विटमध्ये नमूद केले होते.

पनामा पेपर्स गैरव्यवहारातील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शरीफ यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. ते सध्या लाहोरमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com