अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश (वय 94) यांचे शुक्रवारी (ता. 30) निधन झाले. सिनियर बुश म्हणून ते ओळखले जायचे. शीतयुद्धातून अमेरिकेला बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश (वय 94) यांचे शुक्रवारी (ता. 30) निधन झाले. सिनियर बुश म्हणून ते ओळखले जायचे. शीतयुद्धातून अमेरिकेला बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. 

1989 ते 1993 कालावधीत ते राष्ट्राध्यक्ष पदी होते. सिनियर बुश हे अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर बिल क्लिंटन यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. ते रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी अमेरिकेकडून लढाऊ वैमानिक म्हणून भूमिका बजावली होती. 

तेलउद्योगात यशस्वी झाल्यानंतर ते राजकारणाकडे वळले. शीतयुद्धातून अमेरिकेला बचावण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटूंबियांनी ट्विटरवरून दिली. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former president of America George H W Bush Passed away