'हक्कानी नेटवर्क'चा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

2012 रोजी अमेरिका व संयुक्त राष्ट्रांनी 'हक्कानी नेटवर्क'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. पण अमेरिकेची पूर्वीची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हक्कानी नेटवर्कला पाठिंबा होता. 

काबूल : तालिबान या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या 'हक्कानी नेटवर्क' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानी याचा दीर्घ आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. हक्कानी नेटवर्क ही मूळ अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे, त्यामुळे त्याचा मृतदेह अफगाणिस्तनामध्येच दफन करण्यात येईल, अशी माहिती तालिबानने दिली आहे.

मागील 10 वर्षे हक्कानी हा संधिवातामुळे आजारी होता. तसेच सोविएत विरोधी चळवळींमध्ये त्याने अमेरिकेला मदत केली होती. 1970 मध्ये त्याने हक्कानी नेटवर्क ही दहशतवादी संघटना स्थापन केली. तर 1995 मध्ये त्याने तालिबानला साथ देण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानातील एक कुख्यात दहशतवादी म्हणून हक्कानीचे नाव होते.

2012 रोजी अमेरिका व संयुक्त राष्ट्रांनी 'हक्कानी नेटवर्क'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. पण अमेरिकेची पूर्वीची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हक्कानी नेटवर्कला पाठिंबा होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: founder of haqqani network haqqani dead