नाम हत्याप्रकरणी चौघांना अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

डीएनएचा नमुना दिल्याशिवाय नाम यांचा मृतदेह उत्तर कोरियाच्या ताब्यात न देण्याची आपली भूमिका मलेशिया सरकारने आजही कायम ठेवली आहे.

क्वालालंपू : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या सावत्रभावाच्या हत्येप्रकरणी मलेशिया पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, आणखी चार संशयितांचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, हे चारही जण हत्येच्या दिवशीच देशाबाहेर पसार झाल्याचे वृत्त आहे.

किम जोंग नाम यांची गेल्या सोमवारी (ता. 13) येथे हत्या झाली होती. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन महिलांना आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक झाली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, डीएनएचा नमुना दिल्याशिवाय नाम यांचा मृतदेह उत्तर कोरियाच्या ताब्यात न देण्याची आपली भूमिका मलेशिया सरकारने आजही कायम ठेवली आहे.

Web Title: four arrested in naam suicide