इम्रान खान यांच्या पक्षाच्या आमदारावर गोळीबार हल्ला चार जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इम्रान खान यांच्या पक्षाच्या आमदारावर गोळीबार चार जणांचा मृत्यू

इम्रान खान यांच्या पक्षाच्या आमदारावर गोळीबार चार जणांचा मृत्यू

पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय पक्षाच्या आमदारावर काही लोकांनी बंदुकीने हल्ला केला आहे. केलेल्या हल्ल्यात त्यांचा भाऊ आणि पुतण्या आणि दोन पोलिसांसह एकूण चार जण ठार झाले. पोलिसांच्या माहिती नुसार या हल्ल्यात आमदार जखमी झाले आहेत. पोलासांनी सांगीतल की पाकिस्तान तहरीक -ए-इंसाफ पक्षाचे आमदार मलिक लियाकत खान या हाल्ल्यात जखमी झाले आहेत.

शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर राजधानी पेशावर मधाल एका खाजगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. पुराणमतवादी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लोअर दीर ​​जिल्ह्यातील मैदानी भागात हा हल्ला झाला. या प्रांतात इमरान खान यांची सत्ता आहे. पोलीस अधिकारी जार बादशाह यांनी सांगितले की, पीटीआय आमदाराचा पुतण्या आणि भावाचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करून दोघेही घरी परतत होते.

हेही वाचा: NFC Tags Stickers : 45 रुपयांचे हे स्टिकर फोनवर लावा, बटण न दाबता काहीही शेअर करा.

पाकिस्तानच्या सर्वोच्च तपास संस्थेने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाविरुद्ध बंदी घातलेल्या निधी प्रकरणाच्या तपासात मदत करण्यासाठी पाच सदस्यीय विशेष देखरेख समितीची स्थापना केली आहे. रविवारी प्रसारमाध्यमांच्या वृत्तात असे सांगण्यात आले की, अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढवली आहे. विभागीय पथक सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

Web Title: Four Killed Firing Attack Imran Khan Party Mla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..