थरारक : महासागरात बोट उलटल्यानंतर 'त्या' चौघांनी असे काढले 32 दिवस!

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

प्रशांत महासागरात माणसे वाहून येणे ही नेहमीची बाब आहे. जानेवारी २०१४ मध्ये साल्वादोरचा मच्छीमार जोस अल्व्हारेंगा मार्शल बेटांवर वाहून आला होता.

वेलिंग्टन (न्यूझीलंड) : प्रशांत महासागरात नौका उलटल्यानंतर कसाबसा जीव वाचला; पण किनाऱ्यावर पोचता न आल्याने चार जणांना ज्या अग्निदिव्यातून जावे लागले, ते म्हणजे एखाद्या चित्रपट कथेला शोभेल असेच आहे. नारळातील खोबरे व पावसाचे पाणी यावर या चौघांनी ३२ दिवस तग धरला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पापुआ न्यू गिनियाच्या बोगनविले प्रांतातील एक गटाने समुद्रात ३२ दिवस घालविले असल्याचा दावा केला आहे. ‘सोलोमन स्टार न्यूज’ने या घटनेचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. नाताळ साजरा करण्यासाठी बोगनविलेहून पर्यटकांचा एक गट काटेरेट बेटाकडे २२ डिसेंबरला निघाला होता; पण त्याची छोटी नाव समुद्राच्या पाण्यात उलटली अन् त्यावरील काही जण बुडाले.

- हाफिज सईदला 11 वर्षांचा तुरुंगवास​

बचावलेल्या चार जणांपैकी डॉमनिक स्टॅली म्हणाले की, उर्वरित लोकांनी नाव कशीबशी सरळ करून पुढील प्रवासाला सुरुवात केली; पण दुर्दैवाने समुद्रातील शक्तिशाली प्रवाहामुळे ते खोल पाण्यात खेचले गेले अन् वाहून गेले. यात एका दांपत्याचा मृत्यू झाला. त्यांच्या बचावलेल्या बाळाचाही नंतर मृत्यू झाला. मच्छीमारांच्या अनेक नौका आमच्या जवळून गेल्या; पण त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले नाही.

आम्ही सुमारे दोन हजार किलोमीटरपर्यंत वाहत गेलो. शेवटी २३ जानेवारीला ‘न्यू कॅलेडोनिया बेटावर आम्हाला बाहेर काढण्यात आले. बचावलेल्या पर्यटकांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि १२ वर्षांची एक मुलगी असल्याचे ‘स्टार न्यूज’ने म्हटले आहे.

- कर्मचाऱ्यांसोबतचा संघर्ष 'गुगल'च्या एचआरला भोवला!

या पर्यटकांना गेल्या शनिवारी (ता.८) सोलोमन बेटांची राजधानी होनिआरा येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर पापुआ न्यू गिनीचे उच्चायुक्त जॉन बालावू यांच्या ताब्यात देण्यात आले. महासागरातील पाण्याच्या सततच्या रेट्यामुळे येथे छोटी-छोटी स्वतंत्र बेटे तयार झालेली आहेत. 

- 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा

Image may contain: text

माणसे वाहून येणे नित्याचे 

प्रशांत महासागरात माणसे वाहून येणे ही नेहमीची बाब आहे. जानेवारी २०१४ मध्ये साल्वादोरचा मच्छीमार जोस अल्व्हारेंगा मार्शल बेटांवर वाहून आला होता. इंडोनेशियाचा एक कुमारवयीन मुलगा २०१८ मध्ये मासेमारीसाठी निघालेला असताना त्याची नाव भरकटली. सात आठवडे समुद्रात अडीच हजार किलोमीटर अंतर वाहत आल्यानंतर तो अखेर गुआमच्या किनाऱ्याला लागला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Survive 32 Days Adrift In south pacific ate Coconuts and Drank Rainwater