VIDEO: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूल मॅक्रॉन यांना लगावलं कानशीलात; व्हिडीओ व्हायरल

VIDEO: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूल मॅक्रॉन यांना लगावलं कानशीलात; व्हिडीओ व्हायरल

पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्यॅन्यूअल मॅकॉन यांना एका माणसाने कानशीलात लगावल्याची घटना घडली आहे. ते दक्षिण फ्रान्समध्ये आज दौऱ्यावर असताना हा प्रसंग घडला आहे. अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्याने दिली आहे. बीएफएम वृत्तवाहिनीवर प्रसारित केलेल्या दृश्यांमध्ये ड्रॉम प्रदेशातील ताईन-ल हर्मिटेज गावात 43 वर्षीय व्यक्तीने त्यांच्या कानशीलात मारण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. त्याचा तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मॅक्रॉननी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. राष्ट्राध्यक्षांना चापट मारताच “डाउन विथ मॅक्रॉन-इझम” हे शब्द मोठ्याने उच्चारले गेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. मॅक्रॉन यांच्या सुरक्षा टीमने लगेचच त्या व्यक्तीला पकडून जमिनीवर पाडलं आणि राष्ट्राध्यक्षांना तिथून दूर नेलं. बीएफएम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसंदर्भात दोन लोकांना अटक करण्यात आली आहे.(France President Emmanuel Macron slapped in the face)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com