फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला ; दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

दक्षिण फ्रान्समधील कार्कसॉन शहरापासून जवळ असलेल्या ट्रीब्ज शहरातही एका सुपरमार्केटमध्ये घुसून दहशतवाद्यांनी सुमारे ८ नागरिकांना ओलीस ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पॅरिस : इसिस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी आज (शुक्रवार) फ्रान्स येथे हल्ला केला. दक्षिण फ्रान्समधील कार्कसॉन शहरात चार पोलिसांवर या दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 

France terror attack

दक्षिण फ्रान्समधील कार्कसॉन शहरापासून जवळ असलेल्या ट्रीब्ज शहरातही एका सुपरमार्केटमध्ये घुसून दहशतवाद्यांनी सुमारे ८ नागरिकांना ओलीस ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इसिसचा दहशतवादी शस्त्रासह येथील 'सुपर व्ही' या सुपरमार्केटमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरु केला. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

दरम्यान, फ्रान्स सरकारच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने या हल्ल्याबाबत दुजोरा दिला आहे. तसेच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून, पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France Terrorist Attack Two has been Died