पाकिस्तानमध्ये स्फोटक स्थिती; सोशल मीडिया बंद

तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टरतावादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर हिंसाचार आणि संघटित निदर्शने टाळण्यासाठी पाकिस्तान सरकारने आज ट्वीटर, फेसबुक आणि व्हॉट्‌सअॅप या सोशल मीडिया सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या
Pakistan violence
Pakistan violenceFile Photo

इस्लामाबाद- तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टरतावादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर हिंसाचार आणि संघटित निदर्शने टाळण्यासाठी पाकिस्तान सरकारने आज ट्वीटर, फेसबुक आणि व्हॉट्‌सअॅप या सोशल मीडिया सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या. इस्लामाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रेषित महंमद यांचे व्यंग्यचित्र पुन्हा प्रसिद्ध करण्याच्या फ्रान्समधील नियतकालिकाच्या अधिकाराचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काही महिन्यांपूर्वी समर्थन केल्यावर पाकिस्तानात फ्रान्सविरोधी भावना बळावत चालली आहे. याचाच परिणाम म्हणून ‘टीएलपी’ या संघटनेने फ्रान्सच्या राजदूताच्या हकालपट्टीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर सरकारने या संघटनेचा म्होरक्या साद हुसेन रिझवी याला अटक केली. यामुळे त्याच्या समर्थकांनी देशभर हिंसक आंदोलन सुरु केले. तीन दिवस सुरु असलेल्या या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात किमान ३०० पोलिस जखमी झाले, तर सात पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे पाकिस्तान सरकारने या संघटनेवरच बंदी आणली आहे. याविरोधात संघटित मोर्चा निघू नये आणि हिंसाचार पसरू नये, यासाठी सरकारने आज सोशल मीडियाची सेवा काही काळ बंद केली. नंतर ती पुन्हा सुरु करण्यात आली.

Pakistan violence
'एक डोस घ्या अन् कोरोनाला पळवा'; पाकिस्तान बनवणार स्वदेशी लस

‘फ्रेंच जनतेने पाकबाहेर पडावे’

पाकिस्तानातील हिंसाचाराच्या आणि फ्रान्सविरोधी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानात असलेल्या फ्रेंच नागरिकांनी आणि कंपन्यांनी देशाबाहेर पडावे, अशी सूचना फ्रान्सच्या दूतावासाने त्यांना केली आहे. याबाबत संबंधितांना ईमेल पाठविण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या विमानसेवेच्या माध्यमातून फ्रान्सच्या नागरिकांची परतण्याची सोय केली जाणार असल्याचेही दूतावासाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com