स्वातंत्र्य, समृद्धी, शांततेसाठी भारत-अमेरिकेचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

वॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (ता. 13) व्यक्त केला. 

वॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (ता. 13) व्यक्त केला. 

ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये काल दिवाळी साजरी केली. या प्रसंगी भारतीय व अमेरिकी उच्चपदस्थ उपस्थित होते. ट्रम्प यांनी सलग दुसऱ्या वर्षी दिवाळी साजरी केली. ते म्हणाले, ""दिवाळीसारखा सुंदर सण व्हाइट हाउसमध्ये साजरा करणे हे आपल्यासाठी सन्मानजनक असून आनंददायी वाटते. अमेरिका व जगभरातील बौद्ध, शीख आणि जैन समाजाकडून हा सण साजरा केला जातो. त्यानिमित्त जाहीर केलेल्या सुटीच्या दिवशी अनेक मान्यवर येथे जमले आहेत.'' व्हाइट हाउसमधील ऐतिहासिक "रुझवेल्ट रूम'मध्ये ट्रम्प यांनी दीपप्रज्वलन करून दिवाळीच्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. 

"भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीवादी देश आहे. आपल्या दोन्ही देशांचे संबंध स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांततेसाठी प्रयत्न करतील.'' भारत- प्रशांत विभागात चीन आपले लष्करी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असताना ट्रम्प यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या वेळी ट्रम्प यांची कन्या इव्हान्का याही उपस्थित होत्या. 

भारत- अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापारविषयक वाटाघाटींचा उल्लेख ट्रम्प यांनी केला. दोन्ही देशांमध्ये योग्य प्रकारे चर्चा सुरू आहे. हे आव्हानात्मक असूनही वाटाघाटी सुरू आहेत, असे ते म्हणाले. या दीपावलीनिमित्तच्या या कार्यक्रमात अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सिंह सरणा, त्यांच्या पत्नी डॉ. अविना सरणा, त्यांचे विशेष सहायक प्रतीक माथूर आदी सहभागी झाले होते. 

''भारताशी अमेरिकेचे दृढ संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल आपण कृतज्ञ आहोत. मोदी हे माझे मित्र आहेत आणि आता तिचेही (इव्हान्का) मित्र आहेत. मला भारत आणि भारतीय नागरिकांप्रती खूप आदर आहे''. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Freedom prosperity peace for India US efforts says Donald Trump