फ्रान्स सरकार सैनिकांना बनविणार ‘अजेय योद्धा’

bionic-soldier
bionic-soldier

पॅरिस - इस्लामी दहशतवाद आणि देशाबाहेरील हल्ल्यांचा सामना करीत असलेला फ्रान्स त्यांच्या सैनिकांना ‘अजेय योद्धा’च्या रूपात सादर करण्याच्या तयारीत आहे. तो ‘बायोनिक सैनिक’ तयार करीत असून यासाठी मायक्रोचिपचा वापर करणार आहे. या बायोनिक सैनिकांना शारीरिक वेदना जाणवणार नाहीत, त्यांचा मेंदू वेगाने कार्य करेल आणि ऐकू येण्याच्या क्षमतेतही वाढ होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सैनिकांना जागते ठेवणार
फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाच्या शिष्टाचार समितीने यासाठी मंजुरी दिली आहेत. यानुसार अशा योजनेवर काम करीत असलेल्या अन्य देशांबरोबर फ्रान्स काम करू `द टाइम्स’च्या वृत्तानुसार फ्रान्स अशा औषधी गोळ्या तयार करीत आहे की ज्यामुळे सैनिक दीर्घकाळ जागे राहू शकतील. शिवाय शस्त्रक्रियेने त्यांच्या ऐकण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. मायक्रोचिपची रचना अशी केली आहे की, ज्यामुळे सैनिकांची मेंदूची क्षमता वाढेल, त्यांना ताणविरहित राहता येईल. याशिवाय ते पकडले गेले तरी त्यांची मानसिक स्थिती खंबीर, मन शांत राहील, यावरही भर देण्यात येत आहे. 

सैनिकांवर लक्ष ठेवणारे उपकरण
सैन्याच्या मुख्यालयात बसून सैनिकांचा ठावठिकाणा समजून त्यावर लक्ष ठेवणाऱ्या उपकरणाची निर्मितीही फ्रान्सचे संशोधक करीत आहे. सैनिकांना वेदनांची जाणीव होऊ न देणारे किंवा त्यांना विलगीकरणात ठेवल्यास वेदना सहन करण्याची शक्ती वाढवण्याचे औषधही तयार केले जात आहे. 

काल्पनिक हस्तक्षेपासाठी चौकट
मायक्रोचिपच्या वापराने सैनिकी बळ वाढविण्याच्यादृष्टीने आधीपासून संशोधन करीत असलेले देश फ्रान्सला मागे टाकू शकतील, असा इशारा या वृत्तात देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानात संशोधन न झाल्यास अन्य देशांच्या सैन्यदलांच्या तुलनेत फ्रान्सच्या सैन्याला मोठा फटका बसू शकतो, असे त्यात म्हटले आहे. या संशोधनाला परवानगी दिली असली तरी शिष्टाचार समितीने या काल्पनिक हस्तक्षेपासाठी एक चौकट आखून दिली आहे. अशा प्रकारे सैनिकांच्या मानवतेला धोका पोचता कामा नये आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यात कोणताही अडथळा येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

चीनमध्ये चाचण्‍या सुरू
चीन त्यांच्या सैनिकांची ताकद वाढविण्यासाठी अशा प्रकारे कृत्रिमरीत्या बळ देण्याचा प्रयत्न चीन करीत असून त्यासाठी त्यांनी चाचण्याही सुरू केल्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी यापूर्वीच दिला आहे.

तातडीने अंमलबजावणी नाही - पार्ले
फ्रान्स सैनिकांमध्ये तत्काळ मायक्रोचिप बसविणार नसून अशा बदलांचा सैन्यदलाचा सध्या कोणताही विचार नाही, असा खुलासा फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी केला आहे. मात्र  याबाबत देशाने स्पष्ट भूमिका घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. आपल्याप्रमाणे इतर कोणीही विचार करणार नाही आणि भविष्यात यालाच महत्त्व असल्याने फ्रान्सलाही तयार राहावे लागेल, अशी सूचनाही त्यांनी केली. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com